Supreme Court | (File Image)

महाराष्ट्रासह देशभरातील यंदाचे पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आहे आता अंतिम निकाल जाहीर होणं अजूनही बाकी आहे. आज (26 ऑगस्ट) दिवशी या प्रकरणामध्ये निकाल जाहीर केला नाही. कोर्टाने आजच्या सुनावणींमध्ये पदवी परीक्षा अंतिम निकालाच प्रकरण घेतलेले नाही. याबाबत वकील अलख श्रीवास्तव (Advocate Alakh Alok Srivastava) यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. दरम्यान कोरोना संकटकाळात परीक्षा रद्द करून सरासरी मार्क्सच्या पद्धतीने अंतिम निकाल लावावा आणि विद्यार्थ्यांना पदवी द्यावी असा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र युजीसी परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

युवासेनेच्या याचिकेसोबतच देशातील विविध विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि अन्य कर्मचार्‍यांनाही कोरोना जागतिक आरोग्य संकटामध्ये परीक्षांचा घाट हे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं असा दावा केला आहे. दरम्यान युजीसी विद्यार्थ्यांना पुरेशी काळजी घेत, ऑनलाईन, ऑफलाईन किंवा दोन्ही पर्यायांचा वापर करून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत परीक्षा घेण्यावर ठाम आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं PM नरेंद्र मोदी यांना पत्र; प्रवेश परीक्षा, यंदाचं शैक्षणिक वर्ष पुढे ढकलण्याबाबत विचार करण्याची मागणी

Advocate Alakh Alok Srivastava यांनी ट्वीट करताना लवकरच अंतिम निकाल सुनावला जाईल अशी आशा व्यक्त करतो असं म्हटलं आहे. अद्याप निकालाची तारीख जाहीर झालेली नाही. दोन दिवसांपूर्वीच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यंदाचं शैक्षणिक वर्ष 2021च्या जानेवारीपासून सुरू करण्याबाबाबत विचार करावा तसेच विद्यापीठ परीक्षा, प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार करावा अशा मागणींबाबत पत्र लिहलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडून नीट, जेईई मेन्स, महाराष्ट्र सीईटी 2020 परीक्षा पुढे ढकलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नीट, जेईई परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे.