उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरु केला फेलोशिप प्रोग्राम, सहभागी विद्यार्थ्यांना कमवता येणार महिना 45 हजार
CM Fellowship Programme 2019 (Photo Credits: Twitter)

सध्या 10 वी, 12 वी च्या परीक्षांच्या निकालांची मालिका सुरु असतानाच आता पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारने करिअरची एक नवी संधी, नवी योजना सुरु केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षतेखाली सरकारने 'मुख्यमंत्री फेलोशिप 2019' (Chief Minister Fellowship Programme 2019) ही योजना सुरु केलीय. ह्या फेलोशिप प्रोग्रामची अंमलबजावणी 2019-20 करिता सुरु करायची असल्याचे सांगण्यात येतय. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी ही एक उत्तम संधी असेल असे मुख्यमंत्र्यांनी तमाम पदवीधर विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. ह्या फेलोशिपच्या काही अटी आहेत, त्या नेमक्या काय आहेत, ते पाहूयात..

1. अर्जदार कोणत्या ही शाखेचा पदवीधर आणि किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत.

2. अर्जदाराचे पदवी परीक्षापर्यंतचे गुणपत्र एक जून 2019 पूर्वीचे असावे.

3. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे.

4. तसेच उमेदवाराचे वय 31मे 2019 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 26 वर्ष असावे.

5. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून त्यासाठी 500 रुपये शुल्क आहे.

6. ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 150 उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल.

7.फेलोशिपचा कलावधी हा 11 महिन्यांचा असणार आहे. या अकरा महिन्यात फेलोशिप धारकांना दरमहा मानधन 40 हजार रुपये, प्रवास खर्च 5000 रुपये आणि एकत्रित 45000रुपये छात्रवत्तीच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत.

8. सुरुवातीला निवड झालेल्या उमेदवारांना सात दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात येईल.

17 जूनपासून मुंबईत राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु; 12 दिवस चालणार कामकाज, 18 जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प होणार सादर

ह्या फेलोशिप प्रोग्रामचे सदस्य होण्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 जून 2019 आहे. तसेच अधिक माहितीसाठी https://mahades.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. तसेच काही अर्जासंबंधी काही शंका असल्यास 7030924333/02249295118 ह्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.