SSC कडून CGL,CHSL परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; इथे पहा संपूर्ण डेट शीट
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) कडून बुधवारी (6 ऑक्टोबर) Combined Higher Secondary (10+2) लेव्हल टायर 2 परीक्षा 2020 , टायर 2 आणि 3 Combined Graduate Level Examination 2020 आणि Selection Post (Phase-IX) Examination 2021च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी या परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्रक SSC ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर पाहता येणार आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या माहितीनुसार, Combined Higher Secondary (10+2) Level tier 2 Examination 2020 ही परीक्षा 9 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे तर Combined Graduate Level Examination, 2020 ही परीक्षा 28 जानेवारी आणि 29 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. Combined Graduate Level Examination, 2020 ही परीक्षा 6 जानेवारी दिवशी होईल असं एसएससी कडून सांगण्यात आले आहे. तर Selection Post (Phase-IX) Examination, 2021 ही परीक्षा 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. इथे पहा अधिकृत नोटीस .

एसएससी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या सार्‍या परीक्षा कोविड 19 च्या कडक नियमावलींचं पालन करून घेतल्या जाणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतचे अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी अधिकृत साईट्सला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून एसएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पण आता जसा कोरोनाचा विळखा कमी झाला आहे तसे परीक्षांचे वेळापत्रक जारी झाले आहे. UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये 59 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर असेल शेवटची तारीख.

स्टाफ सिलेक्शन कमिशन देशात विविध मंत्रालयामध्ये कर्मचारी भरतीसाठी परीक्षा घेते. त्याच्याद्वारा उमेदवार निवडले जातात. या परीक्षा विविध पदांसाठी घेतल्या जातात.