SSC CGL Tier I Result 2021 Declared: एसएससी सीजीएल टियर 1 चा निकाल जाहीर; इथे पहा कट ऑफ लिस्ट!
Representative Image (Photo Credits: File)

स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून SSC CGL Tier I Result 2021 जाहीर करण्यात आला आहे. यंदा ज्या विद्यार्थ्यांनी Combined Graduate Level Examination Tier I परीक्षा दिली आहे त्यांना निकाल एसएससी ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर पाहता येणार आहे. यंदा Tier I परीक्षा 11 एप्रिल ते 21 एप्रिल 2022 दरम्यान कम्प्युटर बेस्ड मोड वर झाली होती.

अधिकृत नोटिसीनुसार, Tier I मध्ये मिळालेल्या गुणांनुसार आता विभागवार उमेदवारांची Tier II आणि Tier III साठी यादी बनवली जाईल. त्यामुळे पुढील परीक्षांसाठी तयार होण्याकरिता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासणं आवश्यक आहे.

SSC CGL Tier I Result 2021 कसा पहाल ऑनलाईन ?

  • SSC ची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
  • होम पेज वर उपलब्ध असलेल्या Result link वर क्लिक करा.
  • आता ओपन झालेल्या नव्या पेजवर SSC CGL Tier I Result 2021 वर क्लिक करा.
  • आता एक पीडीएफ ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर चेक करायचा आहे.

Assistant Audit Officer आणि Assistant Accounts Officer या पदांसाठी कट ऑफ जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार,

SC 136.76

ST 131.61

OBC 153.37

EWS 156.81

UR 159.07

अशी कट ऑफ आहे.

दरम्यान पात्र आणि अपात्र अशा दोन्ही उमेदवारांच्या गुणांची यादी एसएससीच्या वेबसाईटवर 12जुलै दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे गुण 12 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पाहू शकतात. याकरिता त्यांना रजिस्टर आयडी आणि पासवर्ड सह लॉगिन करावं लागणार आहे.