
SBI Clerk Prelims Result 2020: स्टेट बॅंक ऑफ इंडिया (The State Bank of India) कडून क्लार्क म्हणजेच लिपीक (Clerk) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (Prelims Result) जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार त्यांचा निकाल sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. काल रात्री उशिरा हा निकाल जाहीर झाला असून ज्या उमेदवारांनी प्रिलिम्सची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांनाच आता मेन्स परीक्षा ( SBI Clerk Mains Exam) देण्यासाठी संधी दिली जाईल. दरम्यान ही परीक्षा 31 ऑक्टोबर 2020 दिवशी आयोजित केली आहे. या परीक्षेची अॅडमीट कार्ड्सदेखील (Admit Cards) जाहीर झाली आहेत. IBPS Clerk Recruitment 2020: आयबीपीएस लिपिक भरती अंतर्गत 2557 पदांसाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; जाणून घ्या पात्रता आणि परीक्षेची तारीख.
एसबीआय या परीक्षेद्वारा देशात सुमारे 8000 जागा भरणार आहे. निवड होणार्या उमेदवाराला ज्युनियर असोसिएट हे क्लेरिकल लेव्हलचं पद दिले जाणार आहे. एसबीआय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारला मेन्स परीक्षा आणि नंतर होणार्या मुलाखतीच्या फेर्या यशस्वीपणे पार करणं आवश्यक आहे. दरम्यान निकालाची घोषणा झाल्यानंतर एसबीआयची साईट निकाल पाहण्यासाठी व्यवस्थित सुरू होत नसल्याच्या तक्रारी देखील अनेक उमेदवारांनी केल्या आहेत.
SBI Clerk, Junior Associate Prelims Result कसा पहाल ऑनलाईन?
- एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
- त्यानंतर ‘careers’ च्या पर्यायवर क्लिक करा.
- रिझल्ट लिंकमध्ये SBI junior associate post चा पर्याय निवडा.
- तुमचे credentials वापरून लॉग ईन करा.
- तुमचा निकाल स्क्रिनवर पाहता येईल. हा डाऊनलोड देखील करून ठेवा.
The results are out! We request all candidates to visit our career site to confirm their eligibility for the main exam which is to be held on 31.10.2020. Visit :https://t.co/k9EtdEOjpS
#ImportantUpdate #SBI #StateBankOfIndia #JuniorAssociates #Exams pic.twitter.com/XsogCA6hOs
— State Bank of India (@TheOfficialSBI) October 20, 2020
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यानंतर मेन्स परीक्षेची तयारी करायची आहे. SBI Clerk Main Exam ही 2 तास 40 मिनिटांची असेल यामध्ये 200 मार्कांसाठी प्रश्नपत्रिका दिली जाईल. चूकीच्या उत्तरासाठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टिम असेल. general financial awareness, general English, quantitative aptitude, आणि reasoning ability या विषयांवर यामध्ये प्रश्न विचारले जातील.
SBI Clerk Main Exam चं अॅडमीट कार्ड कसं डाऊनलोड कराल?
- sbi.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- latest announcement मधील Junior Associate वर क्लिक करा.
- त्यानंतर अॅडमीट कार्ड वर क्लिक करा.
- तुमचे Credentials वापरून लॉग ईन करा.
- तुम्हांला तुमचं अॅडमीट कार्ड दिसेल.
दरम्यान अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना बेसिक पे हा 13,075 रूपये असेल. उमेदवाराचा पगार हा सुमारे 11765 ते 31450 रूपये यामध्ये असू शकेल.