SBI Apprentice Admit Card 2021 जारी करण्यात आले आहेत. एसबीआय ने सोमवार (6 सप्टेंबर) दिवशी हे अॅडमीट कार्ड जारी करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना sbi.co.in. या एसबीआयच्या अधिकृत वेबसाईट वर अॅडमीट कार्ड आणि अन्य महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. SBI Apprentice Recruitment 2021 परीक्षा यंदा 20 सप्टेंबर दिवशी होणार आहे. परीक्षेला सामोर जाताना महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक हे हॉल तिकीट आहे त्यामुळे तुम्हांला हे अॅडमीट कार्ड लवकरात लवकर डाऊनलोड करणं आवश्यक आहे.
एसबीआयची ही नोकरभरती 6100 रिक्त पदं भरण्यासाठी घेतली जात आहे. 26 जुलै 2021 पर्यंत याकरिता अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुभा होती. आता अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी जन्मतारीख आणि रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे. नक्की वाचा: SBI Pharmacist Admit Card 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फार्मासिस्ट पदाच्या भरतीसाठी प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करता येईल डाऊनलोड.
SBI Apprentice Admit Card 2021 कसं कराल डाऊनलोड?
- स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या sbi.co.in. या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी 'Careers'चा पर्याय निवडा.
- 'Engagement of Apprentices under the Apprentices Act, 1961' हे लिहलेली लिंक क्लिक करा आणि 'Download Exam Call Letter.' च्या पर्यायावर क्लिक करा.
- आता Registration Number/Roll Number and Password/Date of Birth इत्यादी माहिती भरा.
- SBI Apprentice Admit Card 2021 तुमच्या स्क्रीन वर दिसेल. ते डाऊनलोड करून ठेवा. त्याची प्रिंट आऊट काढा.
अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही या डिरेक्ट लिंक वर देखील क्लिक करू शकता.
दरम्यान SBI Apprentice म्हणून निवड करताना ऑनलाईन लेखी परीक्षा आणि लोकल लॅग्वेज टेस्ट याचे पात्रता निकष लावले जाणार आहेत. परीक्षा इंग्लिश, हिंदी मध्ये होणार आहे. चूकीच्या उत्तरामध्ये 1/4th मार्क कमी केला जाणार आहे.