RSRS 2021: राज्य सभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी संधी, येत्या 31 मार्च पर्यंत करता येणार अर्ज
Job | File Photo

RSRS 2021: जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण राज्य सभा सचिवालयाकडून इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी एक जाहीरात झळकवली आहे. सचिवालयाच्या जाहीरातीत राज्य सभा अनुसंधान आणि अध्ययन योजनेअंतर्गत डॉ. एस. राधाकृष्णन पीठ, राज्य सभा फेलोशिप आणि राज्य सभा स्टुडंट अँगेजमेंट इंटर्नशिपसाठी योग्य उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्य सभा सचिवालय इंटर्नशिप आणि फेलोशिप 2021 च्या जाहीरातीनुसार फेलोशिपसाठी 4 रिक्त आणि इंटर्नशिपसाठी 10 रिक्त पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

राज्य सभा सचिवालय 2021 च्या जाहीरातीनुसार, इंटर्नशिपसाठी असेच उमेदवार पात्र ठरणार आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोणत्याही विषयात उत्तम गुण मिळालेले असावेत.(D D Sahyadri Dyanganga: 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन; इथे पहा वेळापत्रक)

तर फेलोशिपच्या उमेदवारांसाठी अभ्यासासंबंधित क्षेत्रात पीएचडी करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत त्याचे वय 65 वर्षापेक्षा अधिक नसावे. फेलोशिपचा कालावधी दोन वर्षांसाठी असणार असून ती एका वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते.(UPSC Recruitment 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून Lady Medical Officer सह इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी; उमेदवार 1 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज)

राज्य सभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सचिवालयाची अधिकृत वेबसाइट rajyasabha.nic.in ला भेट द्यावी. तेथे दिलेला फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तो इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्यांनी rssei.rsrs@sansad.nic.in वर आणि फेलोशिपसाठी rksahoo.rs@sansad.nic.in वर इमेल करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च ठरवण्यात आली आहे.