RRC Apprentice Recruitment 2021: रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या 3366 पदांवर नोकर भरती, 4 ऑक्टोंबर पासून करता येईल
Representational Image (Photo Credits: File Photo)

RRC Apprentice Recruitment 2021:  रेल्वे रेक्रूटमेंट सेल, पूर्व रेल्वेने अप्रेंटिस पदासाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण 399 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया येत्या 4 ऑक्टोंबर पासून सुरु होणार आहे.(UGC NET December 2020, June 2021 परीक्षा तारखांमध्ये बदल; इथे पहा नवं वेळापत्रक) 

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी त्या संदर्भातील नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार 3 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली गेली आहे. अखेरच्या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्विकारला जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर केली जाणार आहे.

रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनच्या मते उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डाकडून कमीत कमी 50 टक्के गुणांसह 10 वी किंवा त्यावरील शिक्षण पूर्ण करावे. तसेच उमेदवाराचे वय 15-24 वर्षादरम्यान असावे. या व्यतिरिक्त राखीव उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सूट दिली जाणार आहे. अर्ज करताना लक्षात असू द्या की, नोटिफिकेशन नीट वाचून घेतल्यानंतर अर्ज करावा. अन्यथा एकही चूक झाल्यास अर्ज स्विकारला जाणार नाही आहे.(Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्कमध्ये 492 पदासांठी भरती प्रक्रिया सुरू, आयटीआय उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज)

अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडीब्लूएडी आणि महिलांकडून कोणताही शुल्क स्विकारला जाणार नाही आहे. अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंगचा वापर करावा. या नोकर भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे.