द नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) कडून UGC NET 2021च्या परीक्षे तारखेमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2021 दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर त्याचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. NTA कडून अद्याप या परीक्षेच्या अॅडमीट कार्ड (Admit Card) बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी परीक्षेच्या आधी 22 ते 29 दिवस अगोदर अॅडमीटकार्ड जारी करण्यात आले होते मात्र आता किमान परीक्षेच्या 10 दिवस आधी अॅडमीट कार्ड जारी होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागातील नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रमाचे वेळापत्रक Covid-19 मुळे एक महिना पुढे ढकलले- CM Uddhav Thackeray.
UGC NET 2021 अॅडमीट कार्ड कसं कराल डाऊनलोड?
- NTA UGC NET 2021 ची अधिकृत website ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
- होम पेज वर तुम्हांला UGC NET 2021 admit card डाऊनलोड साठी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल.
- आता लॉगिन पेज वर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, सिक्युरिटी पिन नंबर टाका.
- मोबाईल नंबर, इमेल आयडी व्हेरिफाय केल्यानंतर अॅडमीट कार्ड डाऊनलोड करा.
यंदाही अॅडमीट कार्ड्स पोस्टाद्वारा पाठवली जाणार नाहीत. ती केवळ ऑनलाईन डाऊनलोड साठीच उपलब्ध असतील. जर तुमची कार्ड्स डाऊनलोड होत नसतील तर तुम्हांला NTA helpline number वर सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत संपर्क साधून किंवा ugcnet@nta.ac.in.या वर तुमची समस्या पाठवायचं आवाहन करण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या वेळेत, परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी पोहचायचं आहे. त्याची माहिती अॅडमीट कार्ड वर दिली आहे. युजीसी नेट 2021 परीक्षा प्रश्नावली दोन विभागात असते. त्यापैकी पहिला भाग 50 MCQs सह 100 मार्कांचा आहे. तर दुसरा भाग 100 प्रश्नांसह कमाल 200 मार्कांसाठी आहे. युजीसी नेट 2021 चा अभ्यासक्रम वेबसाईट वर आहे.