File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच 39 कंसल्टेंट, डेटा अॅनालिस्ट आणि अन्य दोन पदांसाठी नोकर भरती करणार असल्याचे घोषित केले. या अधिसुचनेनुसार अर्ज करण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. या नोकर भरती संबंधित इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी सुद्धा आरबीआयने अर्ज करण्याची तारीख वाढवली होती. त्यावेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट ठेवली होती. आरबीआयकडून अर्ज करण्याची तारीख वाढवली असल्यासंबंधित अपडेट 21 ऑगस्टलाच बँकेचे रिक्रुटमेंट पोर्टल opportunities.rbi.org.in येथे जाहीर केले आहे.

आरबीआय सर्विसेस बोर्ड (RBISB) अंतर्गत या पदांसाठी नोकर भरतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरातीनुसार, सर्व पदवीधरांना याचा लाभ घेता येणार आहे. तर एप्लॉइड मॅथ्स, कंसल्टेंट- अल्पाइड इकोनोमेट्रिक्स,इकॉनॉमिस्ट- मायक्रोइकॉनॉमिक मॉडलिंग, डेटा अॅनालिस्ट/एमपीडी, डेटा अॅनालिस्ट/ (Dos-DNBS), डेटा अॅनालिस्ट/(DoR-DNBS), रिस्क अॅनालिस्ट/(DoS-DNBS), रिस्क अॅनालिस्ट/DEIO, आयएस ऑडिटर, फॉरेंसिक ऑडिट मध्ये स्पेशलिस्ट, अकाउंट्स स्पेशालिस्ट, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, प्रोजेक्ट अॅडमिनिस्ट्रेटर आणि नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर यांचा समावेश आहे.(Railway Recruitment 2020: रेल्वेमध्ये 4,499 पदांची नोकर भरती; 10 वी पास करू शकतात अर्ज, जाणून घ्या पदांची माहिती व महत्वाच्या तारखा)

उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर ही फक्त रजिस्ट्रेशनसाठी नसून अर्जामध्ये बदल. प्रिटिंग आणि अर्जाची फी भरण्यासाठी सुद्धा दिली आहे. तर आरबीआयकडून नोकर भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार निर्धारित वेतन दिले जाणार आहे. वर्षिक वेतन 28.20 लाख ते 33. 60 लाख रुपये असणार आहे. बँकेकडून याहून अधिक वेतन देण्याचा सुद्धा विचार करण्यात आला आहे.