Sarkari Naukari (Photo Credits: File Image)

Northeast Frontier Railway Act Apprentice Recruitment 2020: भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची तयारी असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नार्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे (NFR) ने कटिहार, अलीपुरद्वार, रंगिया, लुमडिंग, तिनसुकिया, न्यूबोंगैनगांव आणि डिब्रूगढ़ येथील कार्यालयांमध्ये प्रशिक्षकांच्या 4499 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट, nfr.indianrailways.gov.in वर दिलेल्या प्रक्रियेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदांची संख्या - 4499 पदे

महत्त्वाच्या तारखा:

अधिसूचना दिनांक - 13-8-2020

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 16-8-2020

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15-9-2020

पदांचा तपशील:

कटिहार (केआयआर) आणि टीडीएच वर्कशॉपसाठी एकूण - 970 पदे

अलिपुरद्वार (एपीडीजे) साठी - 493 पदे

रंगिया (आरएनवाय) साठी - 435 पदे

लुमडिंग (एलएमजी) & एस&टी / वर्कशॉप साठी - 1302 पदे

तिनसुकिया (टीएसके) साठी - 484 पदे

न्युबोंगावगाव कार्यशाळा (एनबीक्यूएस) आणि ईडब्ल्यूएस / बीएनजीएनसाठी - 539 पदे

पात्रता –

नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर रेल्वे (एनएफआर) च्या 4499 अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार, मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण झालेला असावा आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय झाला असावा. (हेही वाचा: Indian Army TES 44 Recruitment 2020: 10+2 टेक्निकल एन्ट्री स्किमसाठी नोकरीची संधी, joinindianarmy.nic.in वर करा अर्ज)

वयोमर्यादा -

1 जानेवारी 2020 रोजी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे असले पाहिजे परंतु 24 पेक्षा जास्त नसावे

दरम्यान, ट्रेड, यूनिट आणि कम्यूनिटी अनुसार तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक युनिटमधील गुणवत्ता यादी इच्छित पात्रता परीक्षेच्या गुणांच्या (दहावी) आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांचे गुण समान असल्यास जास्त वयाच्या उमेदवाराला स्थान दिले जाईल.