
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आज सहाय्यक पदांसाठी घेण्यात आलेल्या प्राथमिक परीक्षा 2020 चा निकाल (RBI Assistant Result 2020) जाहीर केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सहाय्यक परीक्षेला बसलेले उमेदवार आरबीआय https://www.rbi.org.in/ च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांचा निकाल तपासून पाहू शकतात.
आरबीआयने 14 आणि 15 फेब्रुवारी 2020 रोजी सहाय्यक प्राथमिक परीक्षा घेतली होती. आरबीआय सहाय्यक प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आरबीआय सहाय्यक मुख्य परीक्षेस बसतील. आरबीआय सहाय्यक मुख्य परीक्षा 29 मार्च 2020 रोजी (रविवारी) घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेची प्रवेशपत्रे आणि परीक्षेचा कालावधी लवकरच आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
आरबीआय ही भरती चाचणी देशभरातील विविध केंद्रांवर 926 सहाय्यक रिक्त जागा भरण्यासाठी घेत आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरूनही त्यांचे आरबीआय सहाय्यक प्रारंभिक परीक्षा निकाल तपासू शकतात.
या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी (LPT) साठी उपस्थित राहणे गरजेचे आहे. आरबीआय सहाय्यक मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भाषा प्रवीणता परीक्षा द्यावी लागेल. भाषा प्रवीणता चाचणी खालील प्रमाणे संबंधित राज्याच्या अधिकृत/स्थानिक भाषेत घेण्यात येईल. अधिकृत/स्थानिक भाषा प्रवीण नसलेले उमेदवार अपात्र ठरविले जातील. (हेही वाचा: 12वी उत्तीर्णांसाठी महाराष्ट्र सरकार मध्ये 7000 पदांसाठी नोकरीची संधी; mahasecurity.gov.in वर करा ऑनलाईन अर्ज)
कार्यालयीन स्थानिक भाषा खालीलप्रमाणे आहेत -
अहमदाबाद - गुजराती, बेंगलुरू - कन्नड, भोपाळ - हिंदी, भुवनेश्वर - उडिया, चंडीगढ़ - पंजाबी/हिंदी, चेन्नई - तामिळ, गुवाहाटी - आसामी/बंगाली/खासी/मणिपुरी/बोडो/मिझो, हैदराबाद - तेलुगु, जयपुर - हिंदी, जम्मू - उर्दू/हिंदी/काश्मिरी, कानपूर व लखनऊ - हिंदी, कोलकाता - बंगाली/नेपाळी, मुंबई - मराठी/कोंकणी, नागपूर -मराठी/हिंदी, नवी दिल्ली - हिंदी, पटना - हिंदी/मैथिली, तिरुवनंतपुरम - मल्याळम