Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Railway Recruitment 2021: जर तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण वेस्ट सेंट्रल रेल्वेकडून ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी नोकर भरती करण्यासंबंधित नोटीस जाहीर केली आहे. वेस्ट सेंन्ट्रल रेल्वेत या नोकर भरती अंतर्गत इलेक्ट्रिशन, वेल्डर, फिटलर. वायरमॅन, कारपेंटर, पेंटर, गार्डनर, स्टेनोग्राफरसह एकूण 561 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.  या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्जाची अंतिम तारखी 27 फेब्रुवारी 2021 आहे.(BARC Recruitment 2021: नर्स ते ड्रायव्हर बीएआरसी मध्ये 63 जागी नोकरभरतीसाठी barc.gov.in वर करा 15 फेब्रुवारी पूर्वी अर्ज)

रेल्वेत ट्रेड अप्रेंटिसच्या या पदांवर 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. त्याचसोबत संबंधित क्षेत्रात ITI असणे अनिवार्य सुद्धा आहे. तर उमेदवाराचे वय कमीत कमी 15 वर्ष आणि अधिकाधिक वय 24 वर्ष असावे. तर आरक्षित वर्गासाठी नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

वेस्ट सेंट्रल रेल्वेत या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क हा सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 170 रुपये तक आरक्षित वर्गासाठी 70 रुपये द्यावा लागणार आहे. उमेदवारांची निवड ही लेखी किंवा मुलाखतीनुसार केली जाणार नाही. तर 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. नोकरीचे ठिकाणी भोपाल येथे असणार आहे.(UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगात 296 पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अधिक)

रेल्वेत ट्रेड अप्रेंटिसच्या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mponline.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज  करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी असल्याचे विसरु नका. अधिक माहितीसाठी येथे क्लिल करुन अधिकृत नोटिस पाहता येईल.