Job (Photo Credits: File Image)

UPSC Recruitment 2021: शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. कारण संघ लोक सेवा आयोग (UPSC) च्या विविध पदांसाठी नोकर भरती केली जाणार असून त्या संदर्भात एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार, ज्युनिअर टेक्निकल ऑफिस, असिस्टंट डायरेक्टर, स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर, फॉरेंसिक मेडिसिन आणि असिस्टंट प्रोफेसर (पब्लिक हेल्थ) सह अन्य काही जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे.(RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Security Guard च्या 241 पदाची भरती; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया)

संघ लोक सेवा आयोगकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून डेटा प्रोसेसिंग असिस्टंट, ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर सह एकूण 296 पदांवर नोकर भरती होणार आहे. या नोकर भरतीसाठी विविध पदांसाठी शैक्षणिक योग्यता विविध आधारवर निर्धारित करण्यात आली आहे. ज्यामध्ये डेटा प्रोसेसिंग असिस्टंटसाठी कंप्युटर मध्ये मास्टर डिग्री किंवा बीटेक केलेले अनिवार्य आहे.

ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर, डेटा प्रोसेसिंग असिस्टंटच्या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 वर्ष. तर असिस्टंट डायरेक्टर आणि लेक्चरर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 वर्ष असावे. या व्यतिरिक्त अन्य पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे वय 40 वर्ष असणे अवाश्यक आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मात्र अन्य वर्गासाठी आणि महिलांसाठी अर्ज निशुल्क आहे.(PWD Engineer Recruitment: 'या' पद्धतीने केली जाते पीडब्ल्यूडी अभियंता भरती; पात्रता, वेतन आणि निवड प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घ्या)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 23 जानेवारी 2021 ते 11 फेब्रुवारी 2021 पर्यंत वेळ असणार आहे. या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखीच्या आधारवर केली जाणार आहे. डेटा प्रोसेसिंग असिस्टेंट आणि ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांना upsc.gov.in वर भेट देत अर्ज करता येणार आहे.