Oil India Recruitment 2021: ऑइल इंडिया लिमिटेड मध्य नोकर भरती, येत्या 16 ऑगस्टपासून 115 पदांसाठी होणार वॉक-इन इंटरव्यू
Representational Image (Photo Credits: File Photo)

OIL Recruitment 2021:  ऑइल इंडिया लिमिटेड मध्ये नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे या नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना 115 रिक्त जागांवर नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र नोकर भरतीसाठी निवड ही वॉक-इन-इंटरव्यूच्या माध्यमातून येत्या 16 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या एका नोटीसीनुसार कॉन्ट्रॅच्युअल असिस्टंट मॅकानिक, ड्रिलिंग, रिम्गॅन, केमिकल असिस्टंट, असिस्टंट रिग इलेक्ट्रिशियन, गॅस लॉगस, इलेक्ट्रिक सुपरवाइजर, असिस्टंट डिझेल मेकेनिक, असिस्टंट फिटर आणि असिस्टंट वेल्डरच्या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट oil-india.com येथे उपलब्ध असलेल्या लिंकवरील अर्ज डाऊनलोड करावा लागणार आहे. अर्ज भरुन झाल्यानंतर तुमच्या कागदपत्रांसह तुम्हाला निर्धारित तारेखेच्या दिवशी वॉक-इन-इंटरव्यूसाठी जावे लागणार आहे. तर जाणून घ्या नोकर भरती मधील रिक्त पदांबद्दल अधिक माहिती.(SBI Apprentice Recruitment 2021: एसबीआयमध्ये अप्रेंटिसच्या 6100 पदांसाठी नोकर भरती, sbi.co.in वर करता येईल अर्ज)

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट मॅकेनिक – आईसीई – 31 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल ड्रिलिंग रिग्मैन – 26 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट मॅकेनिक – पंप – 17 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल केमिकल असिस्टेंट - 10 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट रिग इलेक्ट्रिशियन – 10 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल गैस लॉगर – 8 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल इलेक्ट्रिकल सुपरवाइजर – 5 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट डीजल मॅकेनिक – 5 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट फिटर – 2 पद

>>कॉन्ट्रैक्चुअल असिस्टेंट वेल्डर – 1 पद

इम्लॉयी वेल्फेअर ऑफिस, नेहरु मैदान, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजान येथे इंटरव्यूसाठी यावे लागणार आहे. तर सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यान या ठिकाणी उमेदवारांचे इंटरव्यू घेतले जाणार आहेत.