नेशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा निश्चित तारखेला म्हणजेच 17 जुलै रोजीच पार पडणार आहे. नीट परिक्षा (NEET UG 2022) स्थगित करावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याबाबत याचिका दाखल झाली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परीक्षेसाठी अॅडमीट कार्ड 12 जुलै रोजीच जारी करण्या आले आहेत. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी या परीक्षेला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती.
CUET परीक्षेसोबत तारखांचा गोंधळ आणि सीबीसई (CBSE) परीङेनंतर अल्पावधीतच परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील लक्षावधी विद्यार्थी ही परीक्षा स्थगित करावी अशी मागणी करत होते. सोशल मीडियावर ही या विद्यार्थ्यांनी #PostponeNEET2022 असा हॅशटॅग वापरत मोहीम सुरु केली होती. (हेही वाचा, NEET Admit Card 2022 Released: नीट चं अॅडमीट कार्ड neet.nta.nic.in सोबतच Digilocker, Umang App वरून असं करा डाऊनलोड)
ट्विट
#BREAKING Delhi High Court dismisses plea to postpone #NEETUG2022
— Live Law (@LiveLawIndia) July 14, 2022
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात दाखल याचिका ऐकली. सुनावणी वेळी विद्यार्थ्यांची सर्व बाजू ऐकून घेत दिल्ली उच्च न्यायायाने याचिका फेटाळली. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्याची अथवा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकला नाही.