NEET Admit Card 2022 Released: नीट चं अ‍ॅडमीट कार्ड  neet.nta.nic.in सोबतच Digilocker, Umang App वरून असं करा डाऊनलोड
online ((Photo Credits: Pexels)

The National Testing Agency कडून आज (12 जुलै) मेडिकल एंटरन्स एक्झाम NEET 2022 चं हॉलतिकीट जारी केले आहे. यंदा या परीक्षेसाठी विक्रमी 18.72 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना अ‍ॅडमीट कार्ड अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वरून डाऊनलोड करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. ही प्रवेशपरीक्षा अंडरग्रॅज्युएट मेडिकल आणि डेंटल कॉलेजसाठी आहे. 17 जुलै ला त्याचं आयोजन करण्यात आले आहे.

यंदा NTA कडून परीक्षेसाठी वयाची कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे. यामुळे पहिल्या, दुसर्‍या प्रयत्नांमध्ये ज्यांना यश आले नाही त्यांना संधी मिळणार आहे सोबतच 12वी पर्यंत बायोलॉजीचा अभ्यास केलेल्या नर्स आणि अन्य प्रोफेशनल मधील विद्यार्थ्यांनाही संधी आहे. नक्की वाचा:  NEET 2022 Exam City Slips जारी; neet.nta.nic.in वरून अशी करा डाऊनलोड .

ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल अ‍ॅडमीट कार्ड?

  • neet.nta.nic.in ला भेट द्या.
  • NEET 2022 admit card या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा युनिक आयडी नंबर टाका.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड तपासून डाऊनलोड करा.

नीट परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्यायी मार्ग?

जर विद्यार्थ्यांना थेट वेबसाईट वरून अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येत नसेल तर Umang आणि Digilocker वरूनही अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय आहे. मोबाईल अ‍ॅप, वेबसाईट वरून त्याचा अ‍ॅक्सेस आहे.

  • गूगल प्ले स्टोअर ला भेट द्या.
  • Digilocker / Umang App डाऊनलोड करा.
  • आधार किंवा अन्य माहितीच्या आधारे तुमचं अकाऊंट बनवा.
  • नीट रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर करा.
  • आता तुमचं अ‍ॅडमीट कार्ड उपलब्ध असेल ते डाऊनलोड करा.

जर तुम्हांला अ‍ॅडमीट कार्ड उपलब्ध होत नसेल तर हेल्पलाईन वर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मदत मागू शकता. किंवा neet@nta.ac.in या इमेल आयडी वर तुमची समस्या मांडू शकता.