Supreme Court

सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा अर्थात NEET exam पुन्हा घेण्यात यावी किंवा ग्रेस मार्क्स रद्द करण्याची मागणी करण्यासाठी PIL याचिका सादर करण्यात आली आहे. Motion Education's चे संस्थापक आणि सीईओ Nitin Vijay यांनी NEET परीक्षेतील अनियमिततेबाबत डिजिटल सत्याग्रह मोहिमेअंतर्गत वीस हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या तक्रारी सादर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे अशी माहिती दिली आहे.

याचिकेत विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा पुन्हा घेण्याची किंवा ग्रेस गुण काढून टाकण्याची मागणी केली आहे. या याचिकेत All India First Rank मिळवणारे 67 विद्यार्थी, एकाच केंद्रातील 8 जणांनी अव्वल स्थान पटकावल्याचा तसेच 720 पैकी 718 आणि 719 गुण मिळवणं, निकाल 10 दिवस लवकर जाहीर करणे आणि वेळेचा अपव्यय केल्याबद्दल ग्रेस गुण देण्यात आले आहेत याचा समावेश करत आक्षेप घेण्यात आले आहेत.

याचिकेत नमूद करण्यात आले आहे की 2018 च्या न्यायालयाच्या निर्णयात ज्यावर NTA ने हे ग्रेस मार्क्स आधारित आहेत ते वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रकरणांना लागू होत नसल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. NTA ने केंद्रांवरील CCTV फुटेजच्या आधारे विद्यार्थ्यांनी वाया घालवलेल्या वेळेचे निर्धारण केले, परंतु इतक्या विद्यार्थ्यांसाठी फुटेजचे पुनरावलोकन करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे, NTA ला वेळ गमावल्याबद्दल ग्रेस गुण देण्याचा कोणताही आधार नाही. NEET Result 2024 Controversy: नीट-यूजी 2024 मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन होणार; शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली समिती .

सर्वोच्च न्यायालय आज, मंगळवार, 11 जून, 2024 रोजी एका याचिकेवर सुनावणी करेल, ज्यामध्ये राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा - अंडरग्रेजुएट (NEET-UG) 2024 परीक्षा पेपर लीक झाल्याच्या आरोपांमुळे रद्द करण्यात यावी. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचा समावेश असलेले सुट्टीतील खंडपीठ या प्रकरणाचा आढावा घेणार आहे.