NEET 2021 Exam Date: 1 ऑगस्ट ला होणार वैद्यकीय प्रवेश परीक्षा, NTA ने केली घोषणा
Representational Image (Photo Credits: pixabay)

NEET 2021 Exam Date: राष्ट्रीय चाचणी एजन्सीने NEET 2021 प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यावर्षी, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) 01 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात येईल. शुक्रवारी परीक्षेच्या तारखेची घोषणा करताना शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने (NTA) सांगितले की, ही परीक्षा 'पेन आणि पेपर मोड' मध्ये घेण्यात येईल. वैद्यकीय प्रवेशासाठी NEET परीक्षेची तारीख एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर ntaneet.nic.in/nta.ac.in जाहीर करण्यात आली आहे.

एनटीएने अधिसूचना जारी केली आहे की, MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS, आणि BHMS अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी NEET 2021 संबंधित निकष, मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात येत आहेत. (वाचा - JEE Main Admit Card 2021: जेईई मेन मार्च सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी; jeemain.nta.nic.in लिंकवरून करा डाउनलोड)

NEET प्रवेश परीक्षेस बसण्यासाठी उमेदवार विज्ञान शाखेतून बारावी पास असणे आवश्यक आहे. 12 वी बोर्डाच्या परीक्षेत भाग घेणारे विद्यार्थीदेखील NEET 2021 परीक्षेत सहभागी होऊ शकतात.