NEET Exam प्रातिनिधिक फोटो (Photo Credits: PTI)

NEET-UG Exams 2019 : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार National Testing Agency (NTA) ने National Eligibility cum Entrance Test for undergraduate courses (NEET-UG Exams) या परिक्षेसाठी नोंदणी आणि प्रवेशअर्ज भरण्याची तारीख वाढवली आहे. आता देशभरातील विद्यार्थी 7 डिसेंबर 2018 पर्यंत प्रवेश अर्ज भरू शकणार आहेत. nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशअर्ज भरण्याची सोय देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने NEET 2019 साठी यंदा 25 वर्ष आणि त्यावरील विद्यार्थ्यांना NEET-UG Exams 2019 ला प्रवेश अर्ज भरण्याची मुभा दिली आहे. या परिक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. 7 डिसेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करण्याची तर 8 डिसेंबरपर्यंत प्रवेश शुल्काची रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.

देशभरात MBBS/BDS courses साठी ही प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 5 मे 2019 रोजी परीक्षा पार पडणार आहे. पूर्वी घेत CBSC असलेली ही परिक्षा यंदाच्या वर्षापासून  नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA)घेणार आहे.

प्रवेश अर्जामधील चूका दुरूस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना 14 ते 31 जानेवारी 2019 पर्यंत वेळ दिला जाणार आहे.