Nagpur University Winter Session Exams 2021: नागपूर विद्यापीठाच्या यंदा हिवाळी सत्राच्या परीक्षा 25 मार्च पासून ऑनलाईन
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash.com)

नागपूर शहरामध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवरून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आता या स्थितीमध्येच विद्यार्थ्यांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा देखील पार पडणार आहे. नागपूर विद्यापीठ यंदा या परीक्षा 25 मार्चपासून सुरू करणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात पार पडणार आहेत. याबाबत काल (22 मार्च) रात्री उशिरा निर्देश देण्यात आले आहेत. Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University: वेळापत्रक जाहीर, पण परीक्षा कुठल्या अ‍ॅपवरून होणार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी प्रचंड संभ्रमात.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांची पहिल्या टप्यातील परीक्षा ही बीएससी, बी फार्म, बीए, एलएलबी या अभ्यासक्रमांसाठी होणार आहे. या परीक्षेसाठी विशेष अ‍ॅप नसून विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनच ती होणार आहे. विद्यार्थी अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन किंवा संगणकाच्या माध्यमातून देऊ शकणार आहेत. संगणकावरून पेपर सोडवणार्‍यांना वेब कॅम देखील असणं आवश्यक असणार आहे.

दरम्यान यंदा विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये एका तासामध्ये 40 प्रश्न सोडवायचे आहे. हे सारे प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे. परीक्षेसाठी मिश्र स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. तर कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्रोक्टोरिंग यंत्रणा वापरली जाणार आहे.

कशी द्याल ऑनलाईन परीक्षा?

rtmnu.net/login.aspx यावर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हांला लोकेशन, कॅमेरा, मायक्रोफोन अ‍ॅक्सेस अलाऊ करावा लागणार आहे.

त्यानंतर लॉगिंग करण्यासाठी काही माहिती भरावी लागणार आहे.

सारी माहिती भरल्यानंतर तुम्हांला परीक्षा देण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

यंदा कोरोना संकटामुळे मागील वर्षभर विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत. नागपूरातील वाढती कोरोनारूग्ण संख्य पाहता नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्याचे आणि कोवीड 19 गाईडलाईनचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.