Mumbai Railway Police Recruitment 2022: मुंबई रेल्वे पोलीस विभागात मेगाभरती; जाणून घ्या पदांची नावे, पात्रता व इतर तपशीत
Indian Railways | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग लवकरच काही पदांची भरती करणार आहे. यासाठी अधिसूचना (Mumbai Railway Police Vaccancy 2022) जारी करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 505 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

तपशील-

पोलीस कॉन्स्टेबल एकूण पदे- 505

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी किंवा त्यासमकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम, 1965 अंतर्गत स्थापन केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा सरकारने समतुल्य म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या समकक्ष म्हणून ग्राह्य धरल्या जातील. (हेही वाचा: IIT Bombay Recruitment 2022: आयआयटी बॉम्बे मध्ये नोकरीची संधी; 9 जून पूर्वी iitb.ac.in वर करा अर्ज)

शारीरिक क्षमता-

  • उंची - महिलांसाठी - 155 सेमी

पुरुषांसाठी - 165 सेमी

  • छाती- पुरुषांसाठी- 79 सेमी पेक्षा कमी नसावी.

भरती शुल्क- 

  • खुला वर्ग- रु.450/-
  • मागासवर्गीय- रु.350/-

आवश्यक कागदपत्रे-

  • दहावी, बारावी आणि पदवी शैक्षणिक प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधार कार्ड, परवाना)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्जाची शेवटची तारीख लवकरच कळविली जाणार आहे. अधिक माहितीसाठी या लिंकला भेट द्या - https://mumbairlypolice.gov.in/