Online | Pixabay.com

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून PCB Group च्या परीक्षेसाठी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. सीईटीच्या Physics, Chemistry, Biology या विषयांच्या सीईटीला सामोरे जाणार्‍यांना त्यांचे हॉल तिकीट सीईटी ची अधिकृत वेबसाईट mahacet.org वरून आपली हॉलतिकीट्स डाऊनलोड करता येणार आहे. MHT CET 2025 for PCB ची परीक्षा यंदा 9 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान होणार आहे. यामध्ये 10 आणि 14 एप्रिलला परीक्षा नसेल.

अ‍ॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करताना विद्यार्थ्यांना त्यांचे अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकणं आवश्यक आहे. हॉल तिकीट घेतल्यानंतर त्याच्यावरील तपशील तुम्हांला नीट पाहणं आवश्यक आहे. यामध्ये नाव, परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्र पहा आणि ते कॉपी करून प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.

MHT CET 2025 ची परीक्षा ऑनलाईन माध्यमातून Computer-Based Test आहे. MCQs मध्ये प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. तर 100 मार्कांसाठी ही परीक्षा असणार आहे. प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमातून 20% आणि बारावीच्या अभ्यासक्रमातून 80% प्रश्न विचारले जातील.

MHT CET Admit Card 2025 कशी कराल डाऊनलोड?

  • Maharashtra CET Cell ची वेबसाईट mahacet.org ला भेट द्या.
  • होमपेजवर MHT CET 2025 Admit Card वर क्लिक करा.
  • PCM की PCB group निवडा.
  • आता तुमचा application number आणि password टाका.
  • आता तुमचं अ‍ॅडमीट कार्ड स्क्रिन वर दिसेल.
  • हॉल तिकीट वरील तपशील तपासा.
  • डाऊनलोड करून पीडीएफ फाईल मध्ये सेव्ह करा.

दरम्यान, MHT CET 2025 PCM (Physics, Chemistry, Mathematics) परीक्षा 24 एप्रिल वगळता 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होईल. सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते सायंकाळी 5 मध्ये परीक्षा होईल.