Online | Pixabay.com

स्टेट कॉमन एंटरन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र (State Common Entrance Test Cell, Govt of Maharashtra) कडून यंदाच्या MHT CET परीक्षेसाठी हॉल तिकीटं (Hall Ticket) जारी केली आहे. 4 मे दिवशी अधिकृत वेबसाईट वर ती जारी करण्यात आली आहेत. यंदा सीईटीची परीक्षा देणारे विद्यार्थी mhtcet2023.mahacet.org या वेबसाईट वरून ती डाऊनलोड करू शकणार आहेत. सध्या पीसीएम गटाची म्हणजेच Physics, Chemistry, आणि Mathematics या गटाची परीक्षा देणार्‍यांचं हॉल तिकीट उपलब्ध करण्यात आलं आहे. यंदा सीईटी च्या परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान पार पडणार आहेत. इंजिनियरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली ही परीक्षा देणारे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकतात.

कसं डाऊनलोड कराल PCM हॉल तिकीट?

  • अधिकृत वेबसाईट mhtcet2023.mahacet.org वर क्लिक करा.
  • होम पेज वर Maha CET admit card च्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन डिटेल्स टाकून सबमीट करा.
  • आता तुमचं हॉल तिकीट स्क्रिन वर दिसेल.
  • डाऊनलोड केलेल्या हॉल तिकीटाचं तुम्ही प्रिंट आऊट काढून ठेवू शकता.

(हे देखील नक्की वाचा: JEE Mains Session 2 Result 2023: जेईई मेन्स सेशन 2 चा निकाल जाहीर; jeemain.nta.nic.in वर पहा मार्क्स)

सीईटी परीक्षेचं हॉल तिकीट परीक्षा केंद्रावर जाताना आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. PCM, PCB ग्रुपच्या परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहेत. सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा घेतील. पीसीबी च्या परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान होणार असल्याने त्यांची हॉल तिकीट्स परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी आधी जारी केली जातील.