NTA कडून आज (29 एप्रिल) Joint Entrance Examination (JEE) Main 2023, session 2 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोअरकार्ड NTA च्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in वर पाहता येणार आहे. मेन्स परीक्षेचा टप्पा पार केलेल्यांना जेईई च्या अॅडव्हान्स (JEE Advanced 2023) परीक्षेसाठी तयारी करावी लागणार आहे.
यंदाच्या वर्षी 9 लाख विद्यार्थ्यांनी JEE Mains Session 2 Exam 2023 दिली आहे. आज निकालासोबतच अंतिम उत्तर सूची, टॉपर्स लिस्ट, ऑल इंडिया रॅन्क लिस्ट, कट ऑफ आणि पर्सेंटाईल सोबतच इतर माहिती देखील अधिकृत वेबसाईट वर दिली जाणार आहे. दरम्यान आज स्कोअरकार्ड वर विद्यार्थ्यांना Physics, Chemistry, Mathematics चे मार्क्स तसेच टोटल एनटीए स्कोअर दाखवले जाणार आहे. सोबतच ऑल इंडिया रॅन्क्स देखील असतील.
कसा पहाल JEE Mains Session 2 Exam 2023 निकाल?
- अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर क्लिक करा.
- होमपेजवर 'JEE Mains 2023 session 2 result' वर क्लिक करा. तेथे तुमचे आवश्यक credentials द्यावे लागतील.
- त्यानंतर सबमीट बटण वर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिन वर दिसेल.
- या निकालाची प्रिटआऊट देखील काढून ठेवू शकता.
NTA कडून JEE Mains Session 2 Exam एप्रिल महिन्यात 6, 8, 10, 11, 12, 13 आणि 15 एप्रिल दिवशी आयोजित करण्यात आली होती. प्रोव्हिजनल आन्सर की ही 19 एप्रिलला जारी करण्यात आली होती. तर त्यावर आक्षेप नोंदवण्यासाठी 21 एप्रिल ही अंतिम तारीख देण्यात आली होती. त्यानंतर 24 एप्रिलला अंतिम आन्सर की जारी करण्यात आली आहे.
JEE Advanced 2023 चे रजिस्ट्रेशन 30 एप्रिल पासून आता सुरू होणार आहे. यंदा IIT Guwahati कडून यासाठी प्रवेश परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी jeeadv.ac.in वर सविस्तर तपशील जारी करण्यात येईल.