MHT CET Result 2022 Date: एमएचटी सीईटी  PCM, PCB चा निकाल 15 सप्टेंबरला कुठे, कसा पहाल?
Representative Image ( Photo Credits: Pixabay )

Maharashtra State Common Entrance Test Cell कडून 15 सप्टेंबरला एमएचटी सीईटी PCM, PCB चा निकाल जाहीर केला जाणार आहे. MAH CET Scorecard विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org वर पाहता येणार आहे. पीसीएम ग्रुपची (PCM Group) सीईटीची परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती तर पीसीबी ग्रुपची (PCB Group) परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. आता या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता पालक, विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे.

MAH CET PCM and PCB निकालाच्या स्कोअरकार्ड वर विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, मार्क्स, ऑल इंडिया रॅन्क, कॅटेगरी रॅन्क, रोल नंबर, अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि त्यांची कॅटेगरी हे तपशील दिले जाणार आहेत. नक्की वाचा: MHT CET 2022 Result: सीईटी निकालामध्ये Percentile Score कसा कॅलक्युलेट केला जातो? 

कोणत्या वेबसाईट वर पहा  MHT CET 2022 निकाल?

  • cetcell.mahacet.org
  • mahacet.org

कसा पहाल  MHT CET 2022 निकाल?

  • सीईटी चा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होमपेजवर स्कोअर कार्डच्या लिंक वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन डिटेल्स टाका.
  • निकाल आता स्क्रिन वर पाहता येईल.
  • हा निकाल डाऊनलोड करण्याची देखील सोय आहे.

पात्र विद्यार्थ्यांसाठी MHT CET 2022 सीट अलोटमेंट हे state CET Cell द्वारे ऑनलाइन पद्धतीने केले जाते. यामध्ये Centralized Admission Process राबवली जाते. उमेदवार त्यांचे क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करून त्यांचे सीट अलोटमेंट पाहू शकतात. यामध्ये शासकीय महाविद्यालये, विद्यापीठ महाविद्यालये, शासकीय अनुदानित खाजगी महाविद्यालये, खाजगी विनाअनुदानित महाविद्यालये या ठिकाणी गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातात.