Image used for representational purpose | Photo Credits: commons.wikimedia and unsplash.com

Maharashtra FYJC CET 2021: राज्यात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी च्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी आता सीईटी द्यावी लागणार आहे. मात्र सीईटी देण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली वेबसाइट काही तांत्रिक बिघाडामुळे बंद झाली होती. पण आजपासून विद्यार्थ्यांना FYJC CET साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे, रजिस्ट्रेशनची वेबसाइट दुपारी 3 वाजता सुरु होईल अशी माहिती देण्यात आली आहे.(खुल्या प्रवर्गातून अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्याची संधी उपलब्ध)

सीईटी देण्यााऱ्या विद्यार्थ्यांना येत्या 2 ऑगस्ट पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://cet.11thadmission.org,in येथे भेट देत रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी आता अर्जाचा क्रमांक वापरुन सीईटीची परीक्षा देऊ शकतात असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.(Maharashtra FYJC CET 2021 Exam Date: 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा 21 ऑगस्टला; इथे पहा परीक्षेचं स्वरूप ते अर्जाचे अपडेट्स)

Tweet:

इयत्ता 10 वीचा निकाल साधारणत: 15 जुलै दरम्यान लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. 10 परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने, अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून/परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.