 
                                                                 राज्यात गुरुवारी (27 जून) मराठा आरक्षण (Maratha Reservation) लागू करण्यात आले. त्यानंतर आता अकरावी प्रवेशासाठी (FYJC) मराठा आणि आर्थिक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आरक्षित कोट्यामधून प्रवेशाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिक मागस प्रवर्ग) आणि ईडब्लूएस (आर्थिक दुर्बल घटक) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर एसईबीसी वर्गासाठी 34,251 राखीव जागांपैकी 4557 आणि ईडब्लूएस वर्गासाठी 28,636 जागांपैकी 2600 अर्ज मिळाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच खुल्या प्रवर्गातील विद्याार्थ्यांना प्रवर्ग बदलून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(Maratha Reservation Verdict: मराठा आरक्षण वैध पण 16% नाही, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)
तर अकरावी प्रवेशासाठी एसईबीसी वर्गासाठी 16 टक्के आणि ईडब्लूएस वर्गासाठी 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्याचसोबत अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नाही त्यांच्याकडून पालकांचे हमीपत्र स्विकारले जाणार आहेत.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
