Results | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

SSC Result 2020: इयत्ता दहावीच्या निकालासाठीची प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून SSC चा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. अद्याप कोणत्या तारखेला निकाल जाहीर होईल याची निश्चित माहिती समोर आलेली नसली तरी, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागेल असे सांगितले होते. तसेच cदरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होतो मात्र यंदा कोरोनाच्या (Coronavirus) संकटामुळे पेपर तपासणीसाठी हंडीक अवधी लागला होता म्हणून परिणामी निकालाला सुद्धा उशीर झाला आहे. FYJC Online Admission प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक इथे पहा.

दरम्यान, कोणत्याही दिवशी निकालाची तारीख जाहीर होऊ शकणार असल्याने आयत्या वेळी तुमची धांदळ उडू नये यासाठी अगोदरच तयारीत राहा, दहावीचा निकाल पाहण्याआधी आपले हॉल तिकीट (10th Hallticket) शोधून ठेवा, ज्या दिवशी निकाल असेल तेव्हा mahresult.nic.in वर कशा प्रकारे निकाल पाहायचा हे जाणून घ्या.

बोर्डाचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?

# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.

# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.

# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

याशिवाय maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्वर तुम्हाला तुमचे गुण तपासता येतील. निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ सुद्धा याच वेबसाईटवर जाहीर केली जाईल त्यामुळे Whatsapp Forwards वर अवलंबून राहण्याची गरज नाही.