Maharashtra Board SSC, HSC Results 2024 on mahresult.nic.in: महाराष्ट्रातील एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) म्हणजेच 10वी आणि 12वी परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर करणार आहे. निकाल हे बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर प्रसिद्ध केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दोन्ही वेबसाइट्स सक्रिय होतील. वेबसाइट साइटला भेट देऊन विद्यार्थी त्यांचे निकाल पाहू शकतात.
एसएससी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. मात्र आशा व्यक्त केली जात आहे की, महाराष्ट्र बोर्ड एक ते दोन आठवड्यांच्या दरम्यान mahresult.nic.in वर बारावीचा निकाल जाहीर करू शकते. बारावीच्या निकालानंतर दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल.
असा पहा निकाल-
- प्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर जा.
- मुख्यपृष्ठावर, महाराष्ट्र 10वी, 12वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा
- रोल नंबरसह विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
- 'सबमिट' बटणावर क्लिक करा
- त्यानंतर स्क्रीनवर निकाल दिसतील.
यावर्षी सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा दिली. यंदा 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च या कालावधीत झाली होती. तर 10वी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रात 2023 चा बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर झाला होता, तर दहावीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला होता. (हेही वाचा: Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली शहरातील अनधिकृत शाळांची यादी; पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणे टाळण्याचे आवाहन)
दुसरीकडे, सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत (CBSE Board 10th, 12th Students) बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्याही निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अहवालानुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कधीही दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर करू शकते. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट bse.nic.in वर निकाल पाहू शकतात. गेल्या वर्षी 2023 मध्ये सीबीएसई बोर्डाने 12 मे 2023 रोजी 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले होते. अशा परिस्थितीत यंदाही दोन्ही वर्गांचे निकाल याच तारखेच्या आसपास लागण्याची शक्यता आहे.