10th, 12th Supplementary Result 2024: महाराष्ट्र बोर्ड (Maharashtra Board) कडून यंदा जुलै/ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी (SSC), बारावी (HSC) पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका अधिकृत वेबसाईट वर पाहू शकणार आहेत.
यंदा बोर्डाकडून दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै दरम्यान झाली आहे. तर बारावीची परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान झाली होती. पावसामुळे काही परीक्षा पुढे देखील ढकलण्यात आले होते. जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या परीक्षेला यंदा दहावीचे 28,000 आणि बारावीचे 56,000 पेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. आज त्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कसा पहाल दहावी/ बारावीचा ऑनलाईन निकाल?
- अधिकृ वेबसाईट mahresult.nic.in वर क्लिक करा.
- आईचं नाव आणि रोल नंबर टाका
- तुमचा निकाल स्क्रिन वर दिसू शकेल.
- तुम्हांला तुमचा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट देखील काढून ठेवू शकाल.
दरम्यान विद्यार्थ्यांना 24 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. हे अर्ज देखील ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहेत.
पुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये त्यांच्या मुख्य परीक्षेच्या निकालांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. मे महिन्यात जाहीर झालेल्या निकालांमधील गुणांवर खूष नसलेल्यांसाठी ही एक दुसरी संधी असते. या परीक्षेच्या गुणांवर त्यांना पुढील मार्ग मोकळे होतात.