Nabard Consultancy Services मध्ये प्रकल्प सल्लागार पदाच्या 6 जागांसाठी भरती, पाहा काय आहे शिक्षणाची अट
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Nabcons) मध्ये प्रकल्प सल्लागार पदाच्या 6 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी येत्या 25 ऑक्टोबर 2019 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. तसेच या पदाकरिता 41,000 ते 60,000 वेतनमान ठेवण्यात आले आहे.

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये Project Consultant पदासाठी 6 जागांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर ही आहे. तसेच या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान पदवीधर तसेच पीएचडी केलेला असणे गरजेचे आहे. तसेच त्याला किमान 1 ते 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा- ISRO मध्ये वैज्ञानिक अभियंत्यांसाठी 327 पदांसाठी नोकरभरती

यासाठी वयाच्या अटीबद्दल बोलायचे झाले तर, 1 सप्टेंबर 2019 पर्यंत 24 ते 60 वर्षे हे वय असणे बंधनकारकारक आहे. या पदाचा अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पदा करिता वेतनमान 41,000 ते 60,000 रुपये ठेवण्यात आले आहे. सरकारी नोकरी शोधताना उमेदवारांना सर्वात मोठी चिंता असते ती नोकरीचे ठिकाण. तर अशा उमेदवारांना या पदाकरिता बरीच ठिकाणे देण्यात आली आहेत. त्यात मुंबईसह रायपूर, छत्तीसगड, केरळ आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. या Nabcons च्या पदाविषयी आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर नाबार्ड च्या www.nabcons.com या संकेत स्थळाला भेट द्या.

त्याचबरोबर भारतीय आंतराळ संस्था इस्रो (ISRO) यांनी वैज्ञानिक अभियंत्यांसाठी नोकर भरतीसाठी सुचना जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण 327 रिक्त पदांवर नोकरभरती करण्यात येणार आहे. BE/B-Tech किंवा त्या संदर्भातील पदवीधर उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी या नोकरभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर अर्जाची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2019 ठेवण्यात आली आहे.