JEE, NEET Preparation: नॅशनल टेस्ट अभ्यास ऍप मध्ये आता हिंदी मध्ये देता येणार Mock Test; केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती
Representational Image (Photo Credits: alexisrbrown.com/ unsplash.com)

JEE, NEET च्या परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल (Union Minister Ramesh Pokhriyal) यांच्या माहितीनुसार, नॅशनल टेस्ट अभ्यास ऍप (National Test Abhyas App) मध्ये आता विद्यार्थ्यांना हिंदी मध्येही मॉक टेस्ट देता येणार आहे. यापूर्वी केवळ इंग्रजी मध्ये या टेस्ट देता येत होत्या. या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यास उमेदवारांना मदत होईल आणि भाषा हा अडथळा ठरणार नाही. हे अॅप नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने लाँच केले आहे आणि यापूर्वीच 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हिंदी प्रश्नांची नवीन फीचर मिळविण्यासाठी जे लोक आधीपासूनच अ‍ॅप वापरत आहेत त्यांना गुगल प्ले स्टोअर (Google Play Store)  वरून त्यांचे अ‍ॅप अपडेट करावे लागतील. हे अ‍ॅप सध्या एकूण 27 मॉक पेपर्स ऑफर करीत आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. नॅशनल टेस्ट अभ्यास अॅप मध्ये आता हिंदी मध्येही मॉक टेस्ट पेपर उपलब्ध असणार आहेत. यासाठी खूप दिवसांपासून मागणी होती अशावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पोखरियाला यांनी म्हंटले आहे.National Test Abhyas App: यंदा JEE, NEET 2020 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन अ‍ॅप वर तयारी जोरात; सुमारे 10 लाख जणांनी दिल्या Mock Tests

रमेश पोखरियाल ट्विट

दरम्यान, हिंदी मध्ये मोक टेस्ट सोबतच विद्यार्थ्यांना आता या टेस्ट ऑनलाईन नसतानाही देता येणार आहेत, म्हणजेच मोबाईल ऑफलाईन असताना टेस्ट देण्यासाठी नेटची गरज लागणार नाही फक्त टेस्ट सुरु करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी इंटरनेटची गरज असेल. जेईई आणि नीट सोबतच आता अन्यही परीक्षांचे सर्व प्रश्नपत्रिका या ऍप मध्ये समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे पोखरीयल यांनी सांगितले आहे.