National Test Abhyas App: यंदा JEE, NEET 2020 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन अ‍ॅप वर तयारी जोरात; सुमारे 10 लाख जणांनी दिल्या Mock Tests
Students | Representational Image (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरस दहशतीचा फटका देशभरातील विद्यार्थ्यांना, महत्त्वाच्या परीक्षांना बसला आहे. दरम्यान कोरोनावर मात करत आता सरकारने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मुलांच्या प्रवेश परीक्षा नीट आणि जेईईच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान देशात लॉकडाऊन असल्याने NTA ने यंदा NEET आणि JEE Main 2020 ची परीक्षा देणार्‍यांसाठी National Test Abhyas app लॉन्च केले आहे. दरम्यान TOI च्या रिपोर्टनुसार, सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांनी ते डाऊनलोड केले आहे. तसेच यंदाच्या परीक्षेची तयारी करताना ते वापरलं आहे.

लॉकडाऊन असल्याने शाळा, कॉलेजसोबतच प्रायव्हेट ट्युशन देखील बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे. दरम्यान National Test Abhyas app हे 45% निम शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून वापरण्यास सुरूवात केली आहे तर त्यापैकी 37% विद्यार्थ्यांना क्लासेसची कोणतीच जोड नसल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान 19 मे दिवशी National Test Abhyas app लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी NEET आणिJEE Main 2020 ची यंदाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी काही मॉक टेस्ट आहेत. दररोज विद्यार्थी नवीन मॉक टेस्ट देऊ शकतात. AI platform च्या मदतीने विद्यार्थ्यांना त्यांची जमेची आणि कमकुवत बाजू सांगितली जाते. NEET, JEE Main 2020 Admit Card विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे मिळणार? पहा तारखांबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स.

 Dr Ramesh Pokhriyal Nishank यांचे  ट्वीट  

कोरोना व्हायरस देशभर फैलावत असला तरीही पुरेशी काळजी घेत यंदा विद्यार्थ्यांसाठी जेईई मेन्सची परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेण्याचा सरकारचा विचार आहे. तर नीट 2020 ही वैद्यकीय शास्त्रात शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 26 जुलै दिवशी घेतली जाणार आहे. दरम्यान जेईई मेन्स 2020 परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्ड्स 3 जुलै पासून तर नीट 2020 परीक्षेसाठी अ‍ॅडमीट कार्ड्स 11 जुलै पासून देण्यास सुरूवात होऊ शकते.