
National Testing Agency (NTA) कडून आज (19 एप्रिल) Joint Entrance Examination (JEE) Main session 2 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर पाहता येणार आहे. NTA ने आज फक्त Paper 1 (BE/BTech)चे निकाल जाहीर केले आहेत. Paper 2 (BArch/BPlanning) चे निकाल अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. दरम्यान या निकालामध्ये रिचेकिंग किंवा रिव्हेल्युएशनची सोय नसते. त्यामुळे या निकालाचे मार्क्स तुमचे अंतिम गुण असणार आहेत. NTA कडून 2-9 एप्रिल दरम्यान झालेल्या जेईई सेशन 2 चा आज निकाल जाहीर झाला आहे. या निकालासोबत कट-ऑफ, Cut-Off for JEE Advanced, All India Rank Holders आणि राज्यातील टॉपर्सची यादी देखील पाहता येईल.
कसा पहाल JEE Main Session 2 Result 2025
- अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
- session 2 scorecard link वर क्लिक करा.
- तुमचे लॉगिंग डीटेल्स टाकून सबमीट करा.
- आता निकाल डाऊनलोड करता येऊ शकतो.
दरम्यान तुमचा निकाल पाहण्यासाठी JEE Mains 2025 application number आणि तुमची जन्मतारीख किंवा पासवर्ड हे डिटेल्स टाकावे लागणार आहेत. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या जेईई मेन पेपर 1 च्या सत्र 2 मध्ये एकूण 9,92,350 उमेदवारांनी परीक्षा दिली होती, ज्यात 6,81,871 महिला आणि 3,10,479 पुरुष होते. नक्की वाचा: High Salary Career Options After 12th Science for Girls: बारावी सायन्स झाल्यावर मुलींसाठी गलेलठ्ठ पगारांसठी करीअर पर्याय; घ्या जाणून .
आज जाहीर झालेल्या निकालामध्ये 24 जणांना 100% गुण मिळाले आहेत असे एनटीए कडून जाहीर करण्यात आले आहे.