JEE Main 2022 Session 2 साठी  Correction Window आज होणार बंद;  jeemain.nta.nic.in वर पहा कसे कराल बदल
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

JEE Main 2022 Session 2 साठी अर्ज केलेल्यांसाठी आज (3 जुलै) Application Correction Window बंद होणार आहे. त्यामुळे ज्यांना त्यांच्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील त्यांच्याकडे आता अवघे काही तास उरले आहेत. jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत बदल स्वीकारले जाणार आहेत.

करेक्शन विंडो मध्ये विद्यार्थ्यांना नाव, शिक्षण, पत्ता असे महत्वाचे तपशील बदलण्याची मुभा दिली जाते. याकरिता देण्यात आलेली अंतिम मुदत ओलांडल्यानंतर NTA कडून त्यामध्ये बदल केले जात नाहीत. हे बदल करण्यासाठी देखील अ‍ॅप्लिकेशन फी द्यावी लागणार आहे. ऑनलाईन पेमेंटच्या स्वरूपात ही फी देता येऊ शकते. NEET 2022 Exam City Slips जारी; neet.nta.nic.in वरून अशी करा डाऊनलोड .

JEE Main 2022 Session 2 च्या अर्जात बदल कसा करायचा?

  • jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुमचे क्रेडेंशिअल वापरून लॉग इन करा.
  • लॉगिन केल्यानंतर “JEE Main Correction in Application Form 2022 link” या लिंक वर क्लिक करा.
  • सूचना नीट काळजीपूर्वक वाचूक ‘Proceed’ वर क्लिक करा.
  • तुम्हाला जिथे बदल करायचे आहेत तेथे पेन टूलचा वापर करा.
  • तुमचे सारे बदल नोंदवल्यानंतर सबमीट वर क्लिक करा.

 

जेईई मेन 2022 सेशन 2 यंदा 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार आहे. JEE Main 2022 देशभरातील अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरल अभ्यासक्रमांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) सह संस्थांमध्ये पदवीपूर्व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.