IOCL Recruitment 2022: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यानुसार टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विभागासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तर IOCL च्या नॉर्थ रिजनसाठी ही नोकर भरती केली जाणार असून एकूण 626 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. अशातच इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी iocl.com येथे भेट द्यावी. अर्ज प्रक्रिया 17 जानेवारी 2022 पासून सुरु झाली आहे. तर जाणून घ्या या नोकर भरती संदर्भात अधिक माहिती.(IBPS Exam Calendar 2022–23 Released: क्लार्क ते RRB Exams साठी तयारी करणार्यांसाठी ibps.in वर परीक्षांच्या तारखा जारी; इथे पहा वेळापत्रक)
टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल विभागासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर इंडियन ऑयल फॉर यू टॅब अंतर्गत करियरसाठी इंडियन ऑयल पर्यंत स्क्रोल करा आणि अप्रेंटिसशिप या ऑप्शनवर क्लिक करा. परंतु तुम्हाला अर्ज करण्यासाठी प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. नोकर भरतीचा फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढण्यास विसरु नका.(RBI Recruitment 2022: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया मध्ये Specialist Officer ची नोकरभरती; 4 फेब्रुवारी पर्यंत करा rbi.org.in वर अर्ज)
ही नोकर भरती चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथे केली जाणार आहे. आयओसीएलच्या नॉर्थ रीजन कार्यालयात रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2022 आहे. अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.