IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिसच्या 527 पदावर नोकर भरती, जाणून घ्या अधिक
Indian Oil (Photo Credits-Facebook)

IOCL Recruitment 2021:  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पोस्टसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आयओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळ iocl.com येथे अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत नोकर भरती संदर्भात अधिक माहिती घ्यावी. अर्ज करण्याची अखेरची तारीख 4 डिसेंबर आहे. जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार, उमेदवारांना पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड आणि असामसह पूर्व भारतीय राज्यात 527 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. स्क्रिनवर एक नवे पेज सुरु होईल. अप्रेंटिस लिंकवर क्लिक करत तंत्रज्ञान आणि नॉन-टेक्निकलच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर हार्ड कॉपी उमेदवारांनी आपल्याजवळ ठेवावी. तर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी व्यवस्थित नियम आणि अटी वाचून घ्याव्यात.(Railway Recruitment 2021: उत्तर मध्य रेल्वेमध्ये आयटीआय पास ही तरुणांसाठी अप्रेंटिसशिप करण्याची सुवर्णसंधी, 1664 पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू)

नोकर भरती अधिक माहिती:

-पश्चिम बंगाल: 236

-बिहार: 68

-ओडिशा: 69

-झारखंड: 35

-असाम: 119

टेक्निकल अप्रेंटिस आणि नॉन-टेक्निकल अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लेखी परिक्षेसाठी उपस्थितीत रहावे. लेखी परिक्षा 19 डिसेंबरला आयोजित करण्यात येणार आहे. मात्र तारखेत बदल केला जाऊ शकते. या नोकर भरती प्रक्रियेसंबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.