Indian Railway Recruitment: 10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक
Indian Railway | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Indian Railway Recruitment:  भारतीय रेल्वेने 10 वी पास उमेदवारांनी नोकर भरतीसाठी नोटीस जाहीर केली आहे. या नोकर भरती अंतर्गत इच्छुक असलेल्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून कमीत कमी 50 टक्के गुणांसह 10 वी पास असावे. रेल्वेत नोकरीसाठी वेल्डर, वायरमॅन आणि कारपेंटर ट्रेडसाठी 8 वी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करु शकतात. त्याचसोबत भारतीय रेल्वेत फिटर, वेल्डर, वाइंडर, मशीनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मॅकानिक आणि वायरमॅनसाठी ट्रेड्सवर अप्रेंटिसशिपची संधी आहे. अधिक माहितीसाठी rrepryj.org येथे भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांना येत्या 1 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवरांना प्रयागराज, झांसी आणि आगरा विभागात पोस्टिंग केले जाणार आहे. या नोकर भरतीअंतर्गत 1664 रिक्त पदांवर योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. नोकरीच्या नोटिफिकेशनसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत तेथूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.(CRPF Recruitment 2021: केंद्रीय राखीव पोलीस दलात 2439 पदांसाठी भरती, उमेदवारांची निवड प्रकिया होणार मुलाखतीतून)

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ची अधिकृत वेबसाइटवर या नोकर भरती बद्दल नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अर्ज 2 ऑगस्ट पासून उमेदवारांना करता येणार आहे. रेल्वेत अप्रेंटिसशिप करण्यासाठी 9 इच्छुक उमेदवार 01 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. लेव्हल 1 पदावर थेट भरती उमेदवारांना 20 टक्के रिक्त पदांसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रुपये वेतन दिले जाणार आहे.(IOCL Recruitment 2021: इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिसच्या 480 पदासाठी नोकर भरती, सप्टेंबर मध्ये होणार परीक्षा)

अनारक्षित कॅटेगरी मधील उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये शुल्क तर आरक्षित कॅटेगरीसह महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही आहे. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाणार आहे.