Indian Oil (Photo Credits-Facebook)

IOCL Recruitment 2021: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिसच्या पदासाठी भरती केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण 480 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. अशातच ज्या इच्छुक उमेदवारांना या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी iocl.com येथे भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 13 ऑगस्ट पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट आहे. आयओसीए कडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ट्रेंड अप्रेंटिसची नियुक्ती दक्षिण भारतात केली जाणार आहे.

टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ट्रेंड अप्रेंटिस पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अधिकृत सुचना नीट वाचावी, कारण त्यात काही चूक झाल्यास तुमचा अर्ज स्विकारला जाणार नाही आहे. तर जाणून घ्या नोकर भरती संदर्भातील महत्वाच्या तारखा.(Staff Selection Commission Exam: कर्मचारी निवड आयोगाच्या परिक्षा 13 ते 24 ऑगस्ट दरम्यान होणार)

-अर्ज करण्याची तारीख 13 ऑगस्ट 2021

-अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2021

-लेखी परीक्षा 19 सप्टेंबर 2021

-कागदपत्रांचे वेरिफिकेशन 27 सप्टेंबर 2021

उमेदवाराची निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांसह नियमांनुसार तुम्ही योग्य असाल तर केली जाणार आहे. लेखी परीक्षेत एमसीक्यू प्रश्न अशणार आहेत. परीक्षेबद्दल ही काही प्रश्न असतील तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षादरम्यान असावे. या व्यतिरिक्त राखीव वर्गासाठी नियमानुसार सूट दिली जाणार आहे.