ICSI CS June 2021 Exam चं वेळापत्रक Icsi.edu वर जाहीर; इथे पहा नव्या, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या तारखा
Examination | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

ICSI कडून यंदाच्या नव्या आणि जुन्या अभ्यास्क्रमाच्या Foundation, Executive आणि Professional कोर्सच्या परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तारखा icsi.edu वर पाहता येतील. दरम्यान वेळापत्रकानुसार, CS executive and professional परीक्षा 1 जून 2021 पासून सुरू होणार आहे. तर CS Foundation exam 5 आणि 6 जून 2021 ला होईल. या परीक्षा computer based mode मध्ये होणार आहेत.

CS Executive ची जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा 8 जून 2021ला संपणार आहे तर नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा देणार्‍यांचा शेवटचा पेपर 9 जून दिवशी असेल. CS Professional programme exam 10 जूनला संपणार आहे. या परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये सकाळी 9 ते 12 यावेळेत होतील.

ICSI CS exams यंदा डिसेंबर 21 ते 30 दरम्यान झाली. त्यामध्ये ज्यांना सहभागी होता आले नाही त्यांना जून महिन्यात होणार्‍या परीक्षेमध्ये सहभागी होता येईल. यंदा कोविड 19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर one-time opt-out opportunity देण्यात आली आहे.

दरम्यान यंदा opt-out form भरण्याची अखेरची मुदत 15 जानेवारी 2021 आहे. डिसेंबर 2020 ची एक्झाम फी रद्द करून ती जून 2021 च्या परीक्षेसाठी कॅरी फॉरवर्ड केली जाऊ शकते.