Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

Institute of Company Secretaries of India कडून ICSI CS Foundation Admit Card 2021 जारी करण्यात आलं आहे.जे विद्यार्थी फाऊंडेशन एक्सामिनेशन देणार आहेत ते ICSI ची वेबसाईट icsi.edu वरून अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करू शकतात. देशामध्ये ही परीक्षा 13 आणि 14 ऑगस्ट दिवशी होणार आहे.

CS Foundation Programme examination यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी परीक्षा केंद्राऐवजी घरातूनच देण्याची सोय आहे. ही कम्प्युटर बेस्ड आणि proctored exams असेल. दरम्यान विद्यार्थ्यांना remote proctored mode किंवा परीक्षा केंद्र अशी दोन पर्यायामध्ये होती. दरम्यान महाराष्ट्रात 10-20 ऑगस्ट मध्ये या परीक्षा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ऑफलाईन होणार आहे. तेथे परीक्षार्थ्यांना पोहचण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. (नक्की वाचा: Indian Railway Recruitment 2021: परीक्षाशिवाय भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 8 वी, 10 वी उत्तीर्णही करू शकतात अप्लाय, जाणून घ्या पदांची नावे व कुठे कराल अर्ज).

CSI CS Foundation Admit Card 2021 डाऊनलोड कसं कराल?

  • ICSI ची वेबसाईट icsi.edu ला भेट द्या.
  • होम पेज वर ICSI CS Foundation Admit Card 2021 या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे लॉग ईन डिटेल्स टाका.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड स्क्रिन वर दिसेल.
  • तुमचं अ‍ॅडमीट कार्ड पाहून ते डाऊनलोड करा.

दरम्यान ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, डेस्कटॉपची सोय नाही ते विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा देऊ शकतात. यंदा देशभरात 61 शहरांमध्ये परीक्षा केंद्रांची सोय केली आहे