इंस्टिट्युट ऑफ कंपनी सिक्रेटरीज ऑफ इंडिया अर्थात ICSI कडून यंदाचं डिसेंबर सत्रामध्ये होणार्या परीक्षांसाठी CS Admit Card 2021 जारी करण्यात आली आहेत. यंदा CS Executive आणि Professional Program Exam साठी सामोरे जाणार्यांना ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu वरून आपलं अॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर फिजिकली विद्यार्थ्यांना अॅडमीट कार्ड दिली जाणार नाहीत. प्रत्येकाला आपली अॅडमीट कार्ड्स डाऊनलोड करावी लागणार आहेत.
CS Executive आणि Professional Programme Examination या डिसेंबर सत्रासाठी 21 ते 30 डिसेंबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मग तुम्ही या परीक्षेला सामोरं जाणार असाल तर जाणून घ्या ऑनलाईन तुमचं अॅडमीट कार्ड कसं कराल डाऊनलोड?
ICSI CS Admit Card 2021 कसं कराल डाऊनलोड?
- ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट द्या.
- होम पेज वर What’s New section वर क्लिक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल त्यावर ICSI CS Admit Card 2021 ची लिंक तुम्हांला दिसेल.
- त्यानंतर लॉगिन डिटेल्स टाकून तुम्ही सबमीट वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रिन वर तुमचं अॅडमीट कार्ड दिसेल.
- अॅडमीट कार्ड तपासून डाऊनलोड करा, त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.
नक्की वाचा: Central Bank Of India मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 17 डिसेंबर पूर्वी करता येईल अर्ज .
अॅडमीट कार्ड सोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेल्फ डिक्लरेशन फॉर्म देखील भरावा लागणार आहे. तो डाऊनलोड करून संपूर्ण भरून पुन्हा काळजीपूर्वक सादर देखील करावा लागणार आहे. हा फॉर्म परिक्षेच्या पहिल्या दिवशी Superintendent of Exam Centre कडे द्यायचा आहे.