ICSE, ISE Result 2019:आयसीएसई 10 वी आणि 12 वी चा निकाल आज जाहीर होणार आहे. हा निकाल आज दुपारी 3 वाजता cisce.org ह्या संकेतस्थळावर(website) पाहता येईल. साधारणपणे हा निकाल मे च्या पहिल्या आठवठ्यात किंवा एप्रिल अखेरीस लागणे अपेक्षित होता.
कसा पाहाल निकाल?
- सर्वात आधी www.cisce.org संकेतस्थळाला भेट द्या.
- त्या नंतर समोर आलेल्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर विचारण्यात आलेला आयडी नंबर आणि इतर माहिती भरा
- मग Submit बटन दाबा
- तुमचा निकाल दिसेल, अधिक माहितीसाठी त्वरित निकालाची प्रिंट आऊट काढा
ICSE चा निकाल काउंसिलच्या ऑफिशियल वेबसाइट व्यतिरिक्त इतर पोर्टलवरही पाहू शकता. हा पोर्टल म्हणजे examresults.net. त्याशिवाय हा निकाल आपण एसएमएसद्वारा ही पाहू शकता. SMS द्वारा हा निकाल पाहण्यासाठी मोबाईलवर ICSE टाइप करुन पुढे आपला 7 अंकी यूनिक कोड नंबर लिहा आणि 09248082883 ह्या नंबरवर पाठवून द्या. ह्या वर्षी ICSE 10 वी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती, तर ICSE 12 वी ची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली होती.
मागील वर्षी ICSE चा निकाल 14 मे 2018 ला जाहीर झाला होता. ह्यात ICSE 10 वी च्या परीक्षेत 98.53% आणि 12 वी च्या परीक्षेत 96.47% विद्यार्थी पास झाले होते.