ICG AC Recruitment 2021: भारतीय तटरक्षक म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड कडून असिस्टंट कमांडेंट पदासाठी नोकर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र 14 जुलै पर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. आयसीजी असिस्टंट कमांडेट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी joinindiancoastguard.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करावा. भारतीय तटरक्षक द्वारे असिस्टंट कमांडेंट पदासाठी 50 योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
जाहीर करण्यात आलेल्या नोटिस नुसार, असिस्टंट कमांडेंट जनरल ड्युटीसाठी 40 पद आणि टेक्निकल (इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल) साठी 10 पदांवर निवड होणार आहे. यामध्ये एसी जीडीच्या 11 पद आणि टेक्निकलसाठी 3 पद ही अनारक्षित श्रेणीतील आहेत. तर अन्य पदे ही आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी असणार आहेत.
या नोकर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी आणि उच्च शिक्षण संस्थेतून कमीत कमी 50 टक्के गुणांसह संबंधित डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत उमेदवारांना 10+2 स्तरावर गणित आणि फिजिक्स विषय सुद्धा घेतलेला असावा. त्यामुळे अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे.(UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगामध्ये प्रिंसिपल पदासाठी नोकर भरती, उमेदवारांना upsc.gov.in वर करता येईल अर्ज)
तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कडून नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी विविध पदांसाठी नोकर भरतीची घोषणा केली आहे. त्यानुसार मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरसह अन्य पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://www.mahametro.org/ येथे भेट दिल्यानंतर अर्ज करावा. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै दिली गेली आहे.