ICAI CA Result 2021 for Final & Foundation Exam आज जाहीर होणार; कसे पहाल तुमचे मार्क्स?
Results | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Institute of Chartered Accountants of India कडून आज ICAI CA Result 2021 चा निकाल जाहीर होणार आहे. फायनल आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. काल ICAI ने ट्वीट करत दिलेल्या माहितीमध्ये डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज (10 फेब्रुवारी) संध्याकाळी किंवा उद्या (11 फेब्रुवारी) सकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल विद्यार्थी ICAI ची अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर पाहू शकणार आहेत.

ICAI CA Result 2021 कसा पहाल ऑनलाईन?

  • अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org ला भेट द्या.
  • होम पेज वर असलेल्या ICAI CA Result 2021 वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे लॉगिन डिटेल्स सबमीट करा.
  • तुमचा निकाल स्क्रिनवर पाहता येणार आहे.
  • निकालाची प्रत डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

कोणत्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल?

  1. icaiexam.icai.org
  2.  caresults.icai.org
  3.  icai.nic.inइमेल द्वारा देखील विद्यार्थ्यांना निकाल दिला जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपला इमेल आयडी रजिट्रेशन करावं लागणार आहे. 8 फेब्रुवारीपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे.

    दरम्यान यंदा देशभर 5 ते 20 डिसेंबर मध्ये 192 जिल्ह्यांत या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. नव्या स्किमनुसार फाऊंडेशन कोर्स परीक्षा 13 ते 19 डिसेंबर मध्ये झाल्या होत्या. तर नव्या स्किम नुसार फायनल कोर्स परीक्षा 5 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 ते 19 डिसेंबर मध्ये झाल्या होत्या.