IBPS Clerk 2021: सरकारी बँकेत क्लर्क पदासाठी नोकर भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Representational Image (Photo Credits: File Photo)

IBPS Clerk 2021: इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) कडून बँकेत क्लर्क पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्यात विविध सरकारी बँकेत हजारो पदांवर क्लर्क म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँकसह अन्य बँकेत क्लर्क पदासाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ibpsonline.ibps.in संकेतस्थळाला भेट द्यावी.

आयबीपीएस क्लर्क भरतीअंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिट मधून कोणत्याही विषयात ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. तर ग्रॅज्युएशन फायनल वर्षासाठी असलेल्या विद्यार्थी भरती परिक्षेसाठी सहभागी होऊ शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रीलिम्स मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना आयबीपीएस क्लर्क मेन्समध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. परीक्षेत पास झालेल्यांना नोकरी दिली जाणार आहे.(ICG AC Recruitment 2021: भारतीय तटरक्षक असिस्टंट कमांडेंट पदासाठी नोकर भरती, 14 जुलै पर्यंत करता येईल अर्ज)

   महत्वपूर्ण तारखा-

-ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख: 12 जुलै 2021

-ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख- 01 ऑगस्ट 2021

-अर्जाचे शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख-01 ऑगस्ट 2021

आयबीपीएस परीक्षा कॅलेंडर 2021 नुसार क्लर्क भरती परीक्षेचे आयोजन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये केले जाणार आहे. आयबीपीएस क्लर्क प्रीलिम्स परीक्षा 2021 ही 28 ऑगस्ट ते 05 सप्टेंबर दरम्यान असणार आहे. त्यानंतर क्लर्क मेन्स परीक्षा 31 ऑक्टोंबर 2021 रोजी होणार आहे.