NEET Exam Results 2019 Representational Image (Photo Credits: @rawpixel/ unsplash.com)

NEET PG Result 2019: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) द्वारा आज नीट पीजी 2019 (NEET) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल natboard.edu.in किंवा nbe.edu.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. नीट (NEET) परीक्षा दिल्यानंतर मास्टर ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसन (MD) आणि मेडिकल PG डिप्लोमा या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश दिला जातो.

कसा पहाल तुमचा NEET परीक्षेचा निकाल?

nbe.edu.in किंवा natboard.edu.in ही वेबसाईट ओपन करा

वेबसाईटच्या होमपेजवर NEET PG वर क्लिक करा. त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल.

त्यावरील result link वर क्लिक करा.

दिलेल्या फॉरमॅटनुसार आवश्यक माहिती भरा.

योग्य माहिती भरल्यानंतर तुम्हांला स्क्रीनवर निकाल पाहता येईल.

निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

6 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थी सोडून उर्वरित विविध राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली होती. देशभरातून या परिक्षेसाठी 165 केंद्रावर परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नीट पीजी 2019 साठी एकूण 1,48,000 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते.