Ajit Pawar On Maharashtra Health Department Exam: आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा होणार?  सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक - अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credits: ANI)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar)  यांनी पुण्यात असताना पत्रकारांशी सवांद साधला तेव्हा त्यांनी अनेक वेगळ्या विषयावर भाष्य केले. तेव्हा त्यांना विचारण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत झालेल्या घोटाळ्या  (Health Exam Paper issue In Maharashtra) प्रकरणी आपले प्रतिक्रिया दिली. आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून (MPSC) घेणे अशक्य आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar On Health Department Exam ) यांनी व्यक्त केले आहे. शासनाने निर्णय घेतला तर पारदर्शक काम केलं पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

दुर्दैवाने राजेश टोपेंना दोनदा परीक्षा पुढे ढकल्याव्या लागल्या आहेत. तरीही आरोग्य विभाग परिक्षाबाबत असा गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करु कि ते पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी होतेय. त्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. (हे ही वाचा Omicron च्या रुग्णात अशीच वाढ झाली तर आम्हाला विचार करावा लागेल- अजित पवार.)

आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. आता याप्रकरणी राज्य आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता आणखी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींना पेपर मिळाल्याचं स्पष्ट झालं असून अधिकची चौकशी सुरु आहे.

गोपीचंद पडळकरांची आरोग्यमंत्र्यावर टीका

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. तेसच आरोग्य विभागातील घोटाळ्याला आघाडी सरकारचंच अभय होतं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित  केला आहे.

Tweet

आरोग्यमंत्री पदाचा आणि घोटाळेबाजीचा नेमका काय संबंध आहे हे जनतेला कळलं पाहिजे. तसेच या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.