Goa Board SSC Results 2019: गोवा राज्य बोर्डाचा 12 वी नंतर आता 10 वीचा निकालदेखील जाहीर करण्यात आला आहे. यंदा गोव्यामध्ये 18,726 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांचे आज लागणार्या निकालाकडे लक्ष लागले आहे. 21 मे दिवशी दुपारी 11.30 वाजता हा निकाल शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात येणार आहे. हा निकाल gbshse.org सह अन्य थर्ड पार्टी वेबसाईटवर पाहता येणार आहे. यंदा गोव्याचा निकाल 90% लागला आहे. 17556 विद्यार्थी पास झाले आहेत. अधिकृत वेबसाईट सोबत या संकेतस्थळांवर पहा तुमचा निकाल
कसा पहाल दहावीचा निकाल?
- gbshse.org या साईटवर क्लिक करा
- त्यानंतर SSC March 2019 या टॅबवर क्लिक करा
- विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती भरल्यानंतर निकाल पाहता येईल.
- निकालाची प्रत सेव्ह करण्याची, डाऊनलोड करण्याची सुविधा आहे.
यंदा दहावीची परीक्षा गोव्यामध्ये 2 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये पार पडली. मागील वर्षी दहावीचा निकाल 89.64% लागला होता.